मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला डॉक्टरांसाठी मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.mediqueens.in किंवा ९६८९९०८८१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मेडिक्वीनच्या समन्वयक डॉ. लीना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कशिश प्रोडक्शनचे योगेश पवार उपस्थित होते.
      डॉ. पाटील म्हणाल्या की, स्पर्धेचे यंदा हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्रातील  वैद्यक शास्त्रातील सर्व शाखांमधील महिला डॉक्टर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात त्यांना वयाचे बंधन नाही. महिला डॉक्टरांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन सुरू असून अंतिम फेरी पुणे येथे ९, १० व ११ एप्रिल रोजी होईल.
     डॉ. अपूर्वा अहिरराव म्हणाल्या की, महिला डॉक्टरांचे सामाजिक कार्य, आत्मविश्वास, तंदुरूस्ती आरोग्याच्या जागृतीसाठी तसेच त्यांच्यातील स्वत:चा शोध घेण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. कोरोनाकाळात प्रत्येक जीव वाचविण्यासाठी त्यांची खटपट, अपार प्रयत्न आणि समाजासाठी दिलेले योगदान यांचा सन्मान करण्यासाठी स्पर्धा घेत आहोत.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!