खासगी शैक्षणिक संस्थांच्या समस्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
       गृहराज्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नाने राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांच्या विविध समस्याबाबत सोमवारी सायंकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्याच्या विकासात खासगी शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान असून येत्या ५ वर्षात विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य पावले सरकारकडून उचलली जातील, असे आश्वासन ना. अजित पवार यांनी यावेळी दिले.
       या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादाजी भुसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विधी व न्याय विभागाचे सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार राजेंद्र सावंत, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची मुख्य उपस्थिती होती.
        राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांच्यावतीने एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाचे कुलपती अमरीश पटेल, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईचे कुलपती विजय डी. पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणेचे सचिव सोमनाथ पाटील, एमजीएमआयएमएसचे कुलपती कमलकिशोर कदम, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे डॉ. मंगेश कराड, सिम्बॉयसीसच्या उपाध्यक्षा स्वाती मुझुमदार, दत्ता मेघे इंस्टीटयुट ऑफ मेडिकल सायन्स वर्धाचे अध्यक्ष आमदार समीर मेघे, आमदार ऋतुराज पाटील, इंजिनिअर असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष समीर वाघ, संजीवनी एज्युकेशन सोसायटी, कोपरगावचे  खजिनदार अमित कोल्हे, रयत शिक्षण संस्था साताराचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सोमय्या विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. पिल्लाई, संदीप युनिवर्सिटीचे कुलपती संदीप झा, असोसिएशन ऑफ द मॅनेजमेन्टस ऑफ पॉलीटेक्निक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. के. एस. बंदी, असोसिएशन ऑफ द मॅनेजमेन्टस ऑफ ॲग्रीकल्चर अँड ॲग्रीकल्चर अलाईड कॉलेजेसचे अजिंक्य बा. वाघ, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले, असोसिएशन ऑफ द मॅनेजमेन्टस ऑफ अन- एडेड इंजिनीअरींग कॉलेजेसचे सरचिटणीस डॉ. अनिलकुमार गुप्ता आदी या बैठकीत सहभागी झाले.
       या बैठकीत गृहराज्य मंत्री सतेज डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी खासगी शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी व समस्याबाबत प्रेझेन्टेशन दिले.
       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी शैक्षणिक संस्थांच्या सर्व समस्या जाणून घेत राज्याच्या विकासात खासगी शिक्षण संस्थांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या बैठकीत मांडलेल्या विविध मुद्द्यांवर महाराष्ट्र शासन लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घेईल. राज्यात येत्या ५ वर्षात विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य पावले सरकारकडून उचलली जातील असे आश्वासन श्री. पवार यांनी यावेळी दिले. 
       विविध खात्यांचे मंत्री, सचिव व संस्था चालक यांची उपस्थितीत झालेली ही बैठक अतिशय नियोजनबध्दरीत्य पार पडल्याबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यापुढील काळातही विद्यार्थी व पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करू, अशी ग्वाही सर्व खासगी संस्थांच्यावतीने त्यांनी दिली.  
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!