पूर प्रश्नासंदर्भात सोमवारी आढावा बैठक

Attachments


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
       यंदा हवामान विभागाने सुमारे ९८ टक्के इतका पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पश्मिच महाराष्ट्रातील विशेषत: सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो. कोयनेच्या परिक्षेत्रात पडणाऱ्या अति पावसामुळे आणि त्यामुळे येणाऱ्या पुरामुळे या तिन्ही जिल्ह्याचे होणारे आर्थिक आणि मानवी नुकसान टाळण्यासाठी संभाव्य उपाययोजनां संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि.३१) सकाळी ११ वाजता झुम ॲपवर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या इतर अधिकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
      आजरा तालुक्यातील उंचगी ल.पा. प्रकल्पाच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. या आढावा बैठकीत  पुरामुळे होणारे संभाव्य नुकसान कसे टाळता येईल यावर प्रामुख्याने चर्चा अपेक्षित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *