• उदयन गायकवाडचा ‘अकॅडमीक चॅम्पियन’ म्हणून सन्मान
कोल्हापूर • प्रतिनिधी
डॉ.डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ९७.८० टकके गुण प्राप्त करून पॉलिटेक्निकमध्ये प्रथम आलेला तृतीय वर्ष कॉप्युटरचा विद्यार्थी उदयन गायकवाड याचा ‘अकॅडमीक चॅम्पियन’ म्हणून विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यानी सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्यादृष्टीने परीपूर्ण करण्यासाठी संस्था तत्पर असून त्यासाठी जास्तीत जास्त अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सतत प्रयत्न सुरू असल्याचे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी, अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, यासाठी विविध नामवंत कंपन्यांशी करार केला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांना आवश्यक असलेली कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित केली जात असल्याचे नमूद केले.
यावेळी उदयन गायकवाड, आदित्य चौगले तैमिना मोकाशी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.असिफ पटेल यांनी तर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एन. एस. माळी यांनी आभार मानले.
यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, पॉलिटेक्निककच्या उपप्राचार्य मीनाक्षी पाटील, रजिस्ट्रार सचिन जडगे, असिस्टंट रजिस्ट्रार अनिल देशींगे, प्रा. बी. जी. शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा. धैर्यशील नाईक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.