सांगोला तालुक्यातील अकोला येथे गोकुळचे क्‍लस्‍टर बल्‍क कुलरद्वारा दूध संकलन सुरू

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     गोकुळच्‍या बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन श्री.आदर्श महिला सहकारी दूध व्‍याव.संस्‍था मर्या., अकोला, ता.सांगोला, जि.सोलापूर येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्ते तसेच शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्या.,सांगोला चे चेअरमन नानासाहेब लिगाडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व संघाच्‍या संचालक मडंळाच्‍या उपस्थितीत झाले.
      यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्‍यक्ष श्री. लिगाडे म्‍हणाले की, गोकुळचे नाव संपूर्ण देशात नावारूपास येईल यात शंका नाही. तसेच १५ हजार लिटर्स क्षमतेच्या या बल्‍क कुलरमुळे अकोला परिसरातील संपूर्ण दूधाचे याठिकाणी संकलन होण्‍यास मदत होणार आहे. तरी सोलापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादकांना याचा फायदा होणार आहे. गोकुळ दूध संघामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादकाप्रमाणेच सोलापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पाकांचीही प्रगती होणार आहे. भविष्‍यात यासारखे बल्‍क कुलर्स तालुक्‍यात वेगवेगळ्या भागात सुरू करून उत्‍तम गुणवत्‍तेचे दूध संकलन करण्‍यसाठी गोकुळ दूध संघास सहकार्य करू.
      गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि, गोकुळने दूध संकलनाचे कार्यक्षेत्र हे कोल्‍हापूर जिल्‍ह्यापूरतेच मर्यादित न ठेवता शेजारील सिंधुदुर्ग, बेळगाव, सांगली तसेच सोलापूर जिल्‍ह्यात देखील दूध संकलन करण्‍यास सुरूवात केलेली आहे. उत्‍तम गुणवत्‍तेमुळे गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थांना मुंबई, पुणे, कोल्‍हापूर, सांगली, सातारा, बेळगाव तसेच कोकण विभागामध्‍ये दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. ग्राहकांच्‍या पसंतीस उतरलेले गोकुळ दूध नजीकच्‍या काळात महाराष्‍ट्राच्‍या उर्वरित भागाबरोबरच इतर राज्‍यातील प्रमुख शहरांमध्‍ये विक्रीसाठी उपलब्‍ध करून देण्‍याचा गोकुळचा मानस आहे. सध्‍या १३ ते १४ लाख लिटर्स दूध संकलन करणारा गोकुळ २० लाख लिटर्स उद्दिष्‍ट निश्चितच साध्‍य करेल आणि दूध विक्रीचे क्षेत्र वाढल्‍याने दूध विक्रीमध्‍ये वाढ तसेच मूल्‍यवृध्‍दी होऊन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देता येईल.
      उद्घाटनप्रसंगी चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, प्रकाश पाटील यांच्यासह विठ्ठल शिंदे, अशोक शिंदे, जगन्‍नाथ शिंदे, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, श्री आदर्श महिला दूध संस्‍था चेअरमन सौ.राणी चौगुले, सचिव संभाजी चौगुले व संघाचे अधिकारी आदि उपस्थित होते.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!