कोल्हापूर • प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाशी सलग्न दूध पुरवठा करणाऱ्या प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेतर्फे गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) व नूतन संचालक बोर्डाचा संघटनेचे अध्यक्ष के.डी.पाटील यांच्या हस्ते वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारास उत्तर देताना संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) म्हणाले, संघाशी सलग्न प्राथमिक दूध संस्थांमध्ये काम करणारे संस्था कर्मचारी यांचा कोरोना महामारीच्या काळातील दूध संकलनामध्ये मोलाचा वाटा आहे. दूध संस्था कर्मचारी संघटनेचे व दूध संघाचे सबंध सलोक्याचे आहेत. संघ नेहमीच दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या पाठीशी भक्कम पणे उभा राहिला आहे. तसेच दूध संस्था कर्मचाऱ्याकरिता कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी चेअरमन विश्वासराव नारायण पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, अजित नरके, नविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, किसन चौगले, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, डॉ.सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील, दूध संस्था कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील, खजानीस सुरेश जाधव, प्रतिनिधी दत्तात्रय बोळावे, आबासो पाटील आदि उपस्थित होते.