दूध संस्‍था पदाधिकाऱ्यांनी दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा: महादेवराव महाडिक

Spread the love

  कोल्‍हापूर प्रतिनिधी
      गोकुळने संस्‍था व दूध उत्‍पादक समोर ठेवून त्‍यांच्‍या हिताचा कारभार केला असून प्राथमिक दूध संस्‍था पदाधिकाऱ्यांनी संस्‍थेबरोबर दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावे असे आवाहन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.
    पन्‍हाळा व शिरोळ तालुक्‍यातील दूध संस्‍थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालयात करत असताना श्री.महाडिक बोलत होते. यावेळी सहा. निबंधक दुग्ध गजेंद्र देशमुख उपस्थित होते.
     यावेळी पन्‍हाळा तालुक्‍यातील श्री मेढेश्‍वर सह. दूध व्‍याव. संस्‍था मर्या., माजगांव,यांच्‍यासह शिरोळ तालुक्‍यातील सहा संस्‍थाना नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्‍यात आले.
     याप्रसंगी रघुनाथ पाटील – चिखलीकर,अजित शहापुरे, महेश पाटील, मोहन दिंडे, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील यांच्‍यासह दूध संस्‍थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!