कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत पॉलीटेक्निकला डॉ.सुजित मिणचेकर फौंडेशन यांच्यावतीने ”आदर्श पॉलीटेक्निक ” हा पुरस्कार श्री क्षेत्र कुंथुगिरी याठिकाणी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शिक्षक नेते दादा लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. घोडावत पॉलीटेक्निकच्यावतीने प्रा.संदीप वाटेगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर, डॉ.अमर आडके, राजेश पाटील, सौ.लेखा मिणचेकर, प्रविण यादव, राजू मगदूम व संजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
फौंडेशनकडून दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक व आदर्श शाळा हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याबाबतचे सविस्तर निवड पत्र संजय घोडावत पॉलीटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांना सुपूर्द करण्यात आले होते.
संजय घोडावत पॉलीटेक्निकला या आधीही विविध मानांकन व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च व प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रीडेशन अर्थातच एनबीए, नवी दिल्ली समितीकडून सलग दोन वेळा संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या सर्व शाखांना एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. अवघ्या ६ वर्षाच्या कालावधीत एनबीएकडून सर्व शाखांना मानांकन प्राप्त झालेली संजय घोडावत पॉलीटेक्निक ही महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे. संजय घोडावत पॉलीटेक्निकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून ‘इलेक्ट्रिकल मशीन” लॅबला महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाची लॅब म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. याचबरोबर यावर्षी संजय घोडावत पॉलीटेक्निकला टुडे रिसर्च अँड रेटिंग्स, नवी दिल्ली या संस्थेमार्फत ”बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून सर्व शाखांना ”उत्कृष्ट दर्जा” ही मिळाला आहे. तसेच क्नॉलेज रिव्ह्यू मासिकाकडून ”भारतातील टॉप टेन पॉलीटेक्निकमधील एक पॉलीटेक्निक” म्हणून गौरविण्यात आले आहे.
याबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी प्राचार्य विराट गिरी व सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-