नाम. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेनेतर्फे विविध उपक्रमांनी साजरा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
      शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा  वाढदिवस कोल्हापूर शिवसेनेतर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे रु.५ लाखांचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, कोव्हीड सेंटरना आर्थिक पाठबळ आणि एक हजार गरजू नागरिकांना रु.१० लाखाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत असून, राज्य शासनासह कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस कोल्हापूर शहर शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
      नामदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.१३) सकाळी शिवसेना शहर कार्यालय येथे  शिवसेना आणि मेनन इंडस्ट्रीज यांच्यावतीने रु.५ लाखांचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना रु.१० लाखाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रदान सोहळा पार पडला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोफत ऑक्सिजन सेवा राबविणाऱ्या मणेर मस्जिद ट्रस्टला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान करण्यात आले. कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आर्थिक स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात आले.
     यानंतर सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जावून आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान केले. यामध्ये गांधी मैदान येथील कै.विष्णुपंत इंगवले कोविड सेंटरला रु.१ लाख, दिगंबर जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरला रु.५० हजार आणि व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संताजी घोरपडे मोफत कोविड सेंटरला रु.५० हजार अशी मदत करण्यात आली.
     यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे, मेनन कंपनीचे विकास पाटील, पानपट्टी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रमेश खाडे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, अभिषेक देवणे, रियाज बागवान, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, रणजीत मिणचेकर, राज अर्जुनिकर, विशाल पाटील, मणेर मस्जिद ट्रस्टचे हिदायत मणेर, शफिक मणेर, इम्रान मणेर, मेहबूब नदाफ, शकील पटवेगार, हमीद मणेर, गवळी समाजाचे बबन गवळी, युवा सेनेचे सौरभ कुलकर्णी, आदर्श जाधव आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
———————————————–                                                                        Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!