मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मोफत माध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कामगार मंत्रालयाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळच्या मोफत माध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ कागलमध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
      कार्यक्रम संपताच जेवण वाटावयाच्या ठिकाणी जाऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रत्येक पदार्थाची कसून तपासणी केली. त्यानंतर या जेवणाचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी आपल्या बरोबरच सहकार्यानाही व्यासपीठावरच जेवण वाढण्याच्या सूचना त्यांनी पुरवठादाराला केल्या.
     कामगारांसाठी वाटावयाच्या जेवणातूनच ताट भरून घेऊन मंत्री श्री. मुश्रीफ व्यासपीठावरच जेवले. जेवताना त्यांनी चपाती थोडी जाड आहे, ती थोडी पातळ बनवा आणि चांगली भाजा अशा सूचना दिल्या. बाकी इतर जेवणाच्या गुणवत्तेचे कौतुक करतानाच त्यांनी जेवणात काकडी बरोबरच कांदाही देता येतो का पहा, असेही सांगितले.
     महाविकास आघाडी सरकारच्या २० महिन्यांच्या कार्यकाळात अद्भुत काम करणारा जादूगार मंत्री, अशी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख निर्माण झाली आहे. दोन वेळच्या मोफत भोजनाने तृप्त झालेल्या बांधकाम कामगारांनी ही कृतज्ञतेची व समाधानाची भावना व्यक्त केली आहे.
     दरम्यान; मंत्री मुश्रीफ यांनी जेवण पुरवठादाराला अन्नधान्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्या, जास्तीत जास्त पौष्टिक जेवण देण्यासाठी प्रयत्नशील राहा अशा सूचनाही यावेळी केल्या.
     आठवड्यापूर्वीच मंत्री श्री. मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना संदेश दिला होता की, परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे. या काळामध्ये आपण जनतेची सेवा करू. त्यांच्या संकटामध्ये धाऊन जाऊन त्यांना दिलासा देऊया. कोरोना काळामध्ये जनतेच्या सुख- दुःखामध्ये सामील होऊया. विकासकामे करण्याची तर अशी सुवर्णसंधी आली आहे, की गावागावातील विकासकामे अशी करूया की जनता शंभर वर्षे आपले नाव काढेल. परमेश्वराने आपल्याला एवढ्या मोठ्या यशोशिखरावर पोहोचवले आहे की अतिशय विनयाने जनतेला विश्वास देऊया

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!