गव्याच्या धडकेत जखमी विद्यार्थिनीची मंत्री हसन मुश्रीफांकडून विचारपूस

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      बाची (ता.आजरा) येथील कु. शर्वरी सुनील कोंडुसकर या विद्यार्थिनीला दोन दिवसापूर्वी गव्याने जोरदार धडक दिली होती. या धडकेत ती जखमी झाली आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शर्वरीची दवाखान्यांमध्ये जाऊन चौकशी केली. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी गडहिंग्लजमधील देशपांडे हॉस्पिटलमध्ये जावून शर्वरीसह कुटुंबियांना धीर दिला.
      कु. शर्वरी ही आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकते. दोन दिवसापूर्वी ती कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉपवर उतरून घरी चालत जात होती. शेतातील रस्त्याने जात असताना वाटेतच तिला गव्याने धडक दिली. या धडकेत शर्वरीला मानेच्या हाडाला जोरदार मार बसला. सोबत असलेल्या तिच्या दोन मैत्रिणी कु. स्नेहल कोंडुस्कर व कु. सानिका कोंडुस्कर या किरकोळ जखमी झाल्या.       
       यावेळी देशपांडे हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. शैलेश देशपांडे, शर्वरीची आई सौ. सविता सुनिल कोंडुसकर, वसंत कोंडुसकर, महादेव पाटील, उत्तर आजराचे वनपाल बाळेश न्हावी, वनमजूर प्रवीण कांबळे, गुंडेराव पाटील, राजू खणगावे आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!