केडीसीसी बँकेवर बिनविरोध निवडीबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
केडीसीसी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागलच्या गैबी चौकात कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार केला. अर्ज माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होणे कामी सहकार्य केलेल्या उमेदवारांचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आभार मानले.
      यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेच्या निवडणुकीत राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून सर्वच पक्ष एकत्र येत आहेत. या रूपाने राज्यामध्ये एक नवा आदर्श निर्माण होत आहे.
     श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, माझी बिनविरोध निवड होत असताना खा. संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याशी सल्लामसलत केली, त्यांचेही सहकार्य झाले. शाहूसाखर कारखान्याचीही निवडणूक सुरू होती. त्यामध्येही आपल्याला मानणाऱ्या चार-पाच लोकांचे अर्ज राहिले होते. त्यांनीही मोठ्या मनाने माघार घेऊन तीही निवडणूक  बिनविरोध केली.
      कागल तालुक्याच्या विकास सेवा संस्थांचा प्रतिनिधी म्हणून गेली तीस-पस्तीस वर्ष केडीसीसी बँकेमध्ये कार्यरत आहे. गेल्या साडेसहा वर्षाच्या कारकिर्दीत सर्वच सहकारी संचालकांनी मोठ्या विश्‍वासाने बँकेची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्यासह सर्व सहकारी संचालकानी बँकेच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेतला नाही. एवढ्या काटकसरीने कारभार केला. संचालक या नात्याने मालक म्हणून नव्हे तर विश्वस्तांच्या भावनेने काम केले. याच पद्धतीचा कारभार भविष्यातही व्हावा एवढीच अपेक्षा आहे.
     यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ, नगरसेवक चंद्रकांत गवळी, भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, सुरेश बोभाटे- एकोंडी, दत्ता पाटील व कृष्णात मेटील -सिद्धनेर्ली, प्रवीण करनूर, रणजित कांबळे- कसबा सांगाव आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!