कोरोना रुग्णाच्या एका फोनवरच मंत्री मुश्रीफ पोहोचले कोविड सेंटरमध्ये

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     आज शुक्रवारी (दि.२३) सकाळी साडेसातची वेळ….. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ थेट कागलच्या कोविड केअर केंद्रात दाखल झाले. केंद्रात येताच त्यांनी आपला मोर्चा स्वतंत्र महिला रुग्णांच्या विभागाकडे वळविला. महिला रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या औषधोपचारासह जेवण – पाणी आणि सोयीसुविधांचीही चौकशी सुरू केली,  त्याचे कारणही तसेच होते.
      कुणीतरी एका महिला रुग्णाने दूधगंगेच्या महापुराचे पाणी कोविड केंद्राच्या जवळ येत असल्याचा व आंघोळीसाठी गरम पाणी मिळाले नसल्याची तक्रार थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. त्या रुग्णाच्या तक्रारीच्या एका फोनवरच श्री. मुश्रीफ तडक कोविड केंद्रात पोहोचले होते.
      मंत्री श्री. मुश्रीफ यांनी तातडीने तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. व्ही. शिंदे, कागल नगरपालिकेचे अधिकारी यांना केंद्रात बोलावून घेतले. सुमारे एक तास त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
     दूधगंगेच्या महापुरामुळे जर पाण्याची पातळी वाढतच राहिली तर कोविड केअर सेंटरमधील महिला विभाग अन्यत्र हलविण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरसह तातडीने आंघोळीसाठी गरम पाण्याचीही सुविधा उपलब्ध करण्याच्या  सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!