कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगर पालिका कर्मचारी संघाच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. संघाच्या सर्व म्हणजे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नामदार
श्री. मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पवार, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, राजेश लाटकर, विनायक फाळके, महेंद्र चव्हाण या प्रमुखांसह कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वनकुद्रे, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, अजित तिवले यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्मचाऱ्यांनी महापालिकेकडे असलेल्या ४३७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी मुख्य मागणी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यानंतर या विषयाची माहिती घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही पाठपुरावा करु, असे श्री. मुश्रीफ म्हणाले.