एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेतर्फे बी.ए आणि एम.ए ॲडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमाची सुरूवात• २० हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना
कोल्हापूर • प्रतिनिधी
     एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस विद्याशाखेतर्फे बी.ए.ऑडमिनिस्ट्रेशन आणि एम.ए. ॲडमिनिस्ट्रेशन या दोन अभ्यासक्रमाची सुरूवात २०२१-२०२२ पासून करण्यात आली आहे. विद्याशाखेतर्फे युपीएससी आणि एमपीएससी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी बारावीनंतर चार वर्षाचा बी.ए. हा पदवी अभ्यासक्रम आणि पदवीनंतर तीन वर्षाचा एम.ए. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे प्रकल्प संचालक तेजस कराड व एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस विद्याशाखेचे संचालक सुजित धर्मपात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     सुजित धर्मपात्रे म्हणाले, एमआयटी आर्ट डिझाइन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्यातर्फे स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकिय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर बी.ए. ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी आणि पदवीनंतर एम.ए. ॲडमिनिस्ट्रेशन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम देणारी “स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” ही विद्याशाखा सुरू केली आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांची बी.ए. / एम.ए. या अनुक्रमे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यानच यूपीएससी (UPSC) व राज्य पीएससी (MPSC) यांची तयारी करून घेतली जाणार आहे. बी.ए. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून चौथे वर्ष हे इंटर्नशीपचे वर्ष आहे. तर एम.ए. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून तिसरे वर्ष हे इंटर्नशीपचे वर्ष आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पदवीनंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठीचे कार्य केले जाणार आहे. बी.ए. / एम.ए. या अनुक्रमे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर एक वर्षाच्या इंटर्नशिपचाही अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. यात विद्यार्थ्यांच्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या स्पर्धा परीक्षांच्या तिन्ही टप्प्याचा अंतर्भाव केला आहे. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका संबंधित विषयांच्या तज्ज्ञांकडून तपासून विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
     हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण निवासी असून मर्यादित विद्यार्थीसंख्या ठेवून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” सदैव प्रयत्न करणार आहे.
                   विविध पर्याय उपलब्ध…..
     स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश नाही मिळाल्यास विद्यार्थ्यांना पदवीनंतर विद्यापीठांमध्ये एमबीए, लॉ, जर्नलिझम, डिझाइन इत्यादी असे पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकता येणार आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे दुर्दैवाने जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये पास होणार नाहीत, त्यांना खाजगी कंपनीमध्येही नोकरीची संधी प्राप्त होईल.
             २० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना…..
      तेजस कराड म्हणाले, देशाच्या उभारणीसाठी युवकांना तांत्रिक ज्ञानासोबतच मुल्याधिष्ठीत शिक्षण देण्यासाठी आम्ही कठीबद्ध आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येते. या वर्षापासून “एमआयटीस्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस” या विद्याशाखेच्या माध्यमातून लोकसेवा सर्व्हिसेस करण्याची इच्छा असणाऱ्य़ा विद्यार्थ्यांना घडविण्याचा आमचा मानस आहे. या विद्याशाखेत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आम्ही सुरूवात करीत आहोत. यात राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील गरीब, मात्र हुशार विद्यार्थ्यांना मेरीटच्या आधारे मोफत शिक्षण देण्याचा आम्ही निर्णय आम्ही घेतला. २० हुशार विद्यार्थ्यांना या मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेता येईल. यामुळे भविष्यात गरीब विद्यार्थ्यांना याच लाभ होईल.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *