पालकमंत्र्यांचा शब्द पडू देणार नाही अशी कामगिरी करू :आमदार प्रा. जयंत आसगावकर

Spread the love

पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून आ.प्रा. जयंत आसगावकर यांचा सत्कार

कोल्हापूर .प्रतिनिधी

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा ऋणी असून त्यांच्यामुळेच आपल्याला मताधिक्या मिळाले आहे. त्यांचा कोणताही शब्द पडू देणार नाही अशी कामगिरी करू अशी ग्वाही नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी दिली.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांचे आज दुपारी कोल्हापुरात आगमन झाले. ते पुण्यातून आल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात येऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांचा बुके देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी नूतन आमदार आसगावकर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलतांना नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी विधान परिषदेच्या शिक्षक मदतदार संघात आपल्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी संधी दिली. त्यांच्या सहकार्यामुळे मला या निवडणुकीत मताधिक्य मिळवता आहे. त्यामुळं पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही अशी कामगिरी करू अशी ग्वाही नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी दिला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनीही नूतन आमदार प्रा जयंत आसगावकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले, शिक्षक नेते भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, दादा लाड, समीर घोरपडे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख ,मधुकर रामाणे, यांच्यासह शिक्षण संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!