कोल्हापूर • प्रतिनिधी
यशोदा महिला फाऊंडेशनच्यावतीने स्नेहमेळावा झाला. यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या मतदारसंघातून विजयी झालेल्या जयश्री जाधव या पहिल्या महिला आमदार आहेत. मराठी सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत झालेला स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी महिलांसाठी स्पॉट गेमचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी यशोदा फौंडेशनच्या अध्यक्षा तेजस्वी बाबासाहेब पार्टे, उपाध्यक्षा अर्पिता राबाडे, नीता पाटील, स्वामिनी तोडकर, आशा शितोळे, मेघा भांबोरीकर, रुपाली तोडकर उपस्थित होत्या. तसेच फौंडेशनच्या सर्व सभासद महिलाही उपस्थित होत्या.