मुंबई:
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्रीताई चंद्रकांत जाधव यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनीही यावेळी श्रीमती जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
या भेटीप्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे पदाधिकारी अरूण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते