राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ.जयश्रीताई जाधव यांचा सत्कार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी श्रीमती जयश्रीताई जाधव यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीमध्ये जयश्रीताई जाधव विजयी झाल्या. या निवडीनिमित्त कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
      आमदार जयश्रीताई जाधव यांच्या खासबाग येथील ऑफिसमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. जयश्रीताई यांचा सत्कार केला. याप्रसंगी सरचिटणीस सुनील देसाई, जहिदा मुजावर, फिरोज सौदागर, रामचंद्र भाले, उत्तम कोराणे, जहांगीर आत्तार, महादेव पाटील, रेखा उगवे, सुमन वाडेकर, शितल तिवडे, राजू मालेकर, सुनिता राऊत, गणेश जाधव, धनश्री जाधव, निशिकांत सरनाईक, सुनील जाधव, मीरा सरनाईक, प्रमोद माळकर  गणेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!