दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल आ.ऋतुराज पाटील यांचा सत्कार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि काही कालावधीतच कोरोनाचे संकट आले. अशा कठीण काळातही मतदारांना विकासकामांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल मेहता पार्क, वर्षानगर, वृंदावन पार्क, सुभाषनगर, जवाहरनगर, प्रतिभानगर परिसरातील नागरिकांच्यावतीने आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
      कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मतदारांना शब्दाला जागणारा आमदार मिळाला असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.
     सत्काराला उत्तर देतांना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आमदार झाल्यानंतर कोरोनाच्या सावटामुळे प्रत्यक्ष मतदरांपर्यंत पोहचण्यात अडचणी आल्या. ज्या ज्या ठिकाणी पदयात्रा काढल्या, बैठका घेतल्या जनतेचे प्रश्न जाणून घेतले, त्या सोडवण्याच्या दृष्टीने कामही सुरु केले. कोरोनामुळे विकासकामांना निधी खर्च करता आला नाही. आता कोरोनाचं सावट कमी झाले असून विकासकामांना निश्चित गती मिळेल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
     दरम्यान, बुद्ध गार्डन प्रभागातील मेहता कॉलनी येथील हवामहल ते अँस्टर आधार रोडपर्यत गेली पंधरा वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आम. ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक भूपाल शेटे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शेटे, शर्मिला सामंत, अमोल जाधव, अनिल घाटगे यांच्या उपस्थितीत पार पडला. वृंदावन कॉलनी वर्षानगर, संत राहिदासनगर,जवाहरनगर शाहू सेना चौक, पारस हाँस्पिटल ते दत्त स्टेशनरी दुकान यासह सुभाषनगर, जवहारनगर परिसरातील ड्रेनेज गटर्स आणि डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला.
     यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शेटे, राजू साबळे, हरिदास सोनवणे, नियाज खान, अरुण कुराडे, प्रविण बने, शिवाजी पोळ, महेश बागडे , राहुल सोनवणे, अशोक पोळ, उदय चव्हाण, निरंजन कदम, गोपी व्हटकर,अनिल शिंदे यांच्यासह या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!