आमदार रोहित पवार व नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते बाचणीत पूरग्रस्तांना धान्यवाटप

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     बाचणी (ता.कागल) येथील पूरग्रस्त जनतेला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने धान्य वाटप करण्यात आले. आमदार रोहित पवार व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
     यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम सुरू ठेवले आहेत. वैद्यकीय सेवेपासून, नोकर भरती प्रशिक्षण, गरजूंना आर्थिक मदत, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित कुटुंबीयांना धान्य वाटप अशा विधायक उपक्रमांचे या फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद आहे.
     आमदार श्री. पवार व नवीद मुश्रीफ यांनी सुरुवातीला  दूधगंगा नदीकाठी जाऊन पूर बाधित क्षेत्राची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
      यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, निवास पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, सरपंच इक्बाल नायकवडी, सुभाष चौगुले, मारुती दौलू पाटील, उत्तम चौगुले, नामदेव सडोलकर, पीटर डिसोझा, आदी प्रमुख उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!