मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्य भाजपाच्यावतीने कोरोनासंबंधी सेवाकार्याचे आयोजन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आघाडीच्या केंद्र सरकारला दि.३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्यादिवशी भाजपा कोल्हापूर शहर जिल्ह्यामधील सात मंडलांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी दिली.
     कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असे सांगून
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले की, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येणार आहेत. 
     कोल्हापूर शहर जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये ३० मे रोजी भाजपाचे कार्यकर्ते कार्यक्रम राबवतील. त्या मंडलांमधील आशासेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. मंडलांमधील भाजपाचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई, कोविड काळजी केंद्रात आयुर्वेदीक, शक्तीवर्धक काढा वितरण, सीपीआर व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे चपाती-भाजी वितरण इत्यादी कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. 
     शहरातील या कार्यक्रमांचे नियोजन पक्षाचे संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, गायत्री राऊत आदी करत आहेत. ३० मे रोजी होणाऱ्या कायर्क्रमांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सर्व माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते, भाजपाचे सर्व हितचिंतक या सर्व सेवाकार्यात सहभागी होतील. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य चालू आहे. पक्षातर्फे ३० मे चा दिवस विशेष सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल.
—————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!