सर्वपक्षीय खासदारांकडून संसद भवनातील शाहू महाराजांच्या स्मारक मूर्तीस अभिवादन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      ६ मे २०२२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची स्मृतीशताब्दी आहे. यानिमित्त सर्वपक्षीय खासदारांनी बुधवारी संसद भवनातील शाहू महाराजांच्या स्मारक मूर्तीस अभिवादन केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा घडवून आणला. संसदेचे कामकाज ८ एप्रिल रोजी समाप्त होत असल्याने, आजच्या दिवशी हा योग साधला, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
      या अभिवादन सोहळ्यास राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह खासदार शरद  पवार, रावसाहेब दानवे, डॉ.भारती पवार, श्रीनिवास पाटील, अरविंद सावंत, डॉ.सुभाष भामरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, रजनीताई पाटील, डॉ.प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, प्रियांका चतुर्वेदी, हिना गावित, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने,  हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, डॉ श्रीकांत शिंदे, गजानन किर्तीकर, संजय जाधव, नरेंद्र जाधव, विनायक राऊत, प्रतापराव जाधव,  अनिल देसाई, राजेंद्र गावित तसेच अँटो अँटोनी (केरळ), प्रिन्स राज (बिहार), अशोक सिद्धार्थ (उत्तरप्रदेश), रामजी गौतम (उत्तरप्रदेश), बी. बी. पाटील (आंध्रप्रदेश), डॉ. हनुमंतैया (कर्नाटक) उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!