कोल्हापूर • प्रतिनिधी
महावितरणच्या पन्हाळा उपविभागात उच्चस्तर लिपिक (लेखा) या पदावर खेळाडू प्रवर्गातून कार्यरत सौ.अपर्णा महाडीक यांनी रोलबॉल खेळाच्या प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. नुकतेच त्यांनी भारतीय खेळ प्राधिकरणाकडून पटियाला येथील नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्रातून प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत.
भारतीय खेळ प्राधिकरण यांचे अंतर्गत २१ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ या कालावधीत नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्था, पटियाला येथे संचालक डॉ. आय. पी. नागी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने रोलबॉल खेळाचे प्रथमच प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पार पडले.
या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून रोहन दाभाडे, अनिकेत शिरसाट व सौ. अपर्णा महाडीक या तीन जणांची निवड झाली. सौ.अपर्णा विनय महाडीक या पन्हाळा येथील रहिवासी आहेत. त्यांना कोल्हापूर जिल्हा रोलबॉल असोसिएशनचे सचिव अमित पाटील याचे प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल सौ.अपर्णा महाडीक यांचे महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी कौतुक केले आहे.
पुणे येथे रोलबॉल हा खेळ १९ वर्षांपूर्वी सुरु झाला. आजच्याघडीला जगातील ६३ देशामध्ये तो खेळला जातो. आतापर्यंत रोलबॉलचे ५ विश्वचषक झाले आहेत. या खेळाचे जनक राजू दाभाडे हे आहेत.
——————————————————-