मंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा: भाजपा महिला मोर्चा

Spread the love


  कोल्हापूर • प्रतिनिधी
      मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली. यावेळी “धनंजय मुंडे राजीनामा द्या ”  अशाप्रकारे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपा महिला मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
     यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर म्हणाल्या, केंद्राने कोणत्याही पिडीत महिलेची तक्रार त्वरित नोंदवून घेण्याचे निर्देश दिले असतानाही पोलिस आयुक्तांकडे जाऊन देखील तक्रार घेतली जात नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राज्यामध्ये महिला सुरक्षित नसतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.
     भाजपा महानगर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धनंजय मुंडे प्रकरणात काहीही बोलण्यास तयार नाहीत. महाविकास आघाडी सरकारला महिलांच्या प्रश्र्नांच्या बाबतीत काही घेणे देणे नाही असे दिसून येत आहे.
     ग्रामीण महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी पिडीत महिलेपासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. यांना त्यांचे नाव दिले आहे याचा अर्थ मुंडे यांना पाच अपत्य असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगापासून लपवली आहे, यामुळे त्यांनी त्वरित मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
      यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारती जोशी, जिल्हा चिटणीस सुलभा मुजुमदार, महिला आघाडी सरचिटणीस आसावरी जुगदार, मंगल निपाणीकर, लता बर्गे, शोभा कोळी, सुनिता सूर्यवंशी, धनश्री तोडकर, राधिका कुलकर्णी, स्वाती कदम, गौरी जाधव, विद्या बनछोडे, विद्या पाटील, कविता लाड, चिनार गाताडे, सुषमा गर्दे, नूतन मुतगी, सुमन कांबळे, पद्मजा माळी, सुलोचना नार्वेकर, संगीता पंडे, संगीता माळी, यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!