• गोकुळ संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते फळे वाटप
कोल्हापूर • प्रतिनिधी
देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुरगुडमध्ये रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम झाला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुरगुड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली.
मुरगूड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना नवीद मुश्रीफ म्हणाले, आमचे नेते शरद पवार यांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण ही शिकवण आम्हां सर्वांना दिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन याच खऱ्या शुभेच्छा आहेत. यावेळी रणजित सूर्यवंशी, राजू आमते, डॉ. सुनील चौगुले, गणपतराव मांगोरे, अमर देवळे, प्रणव बोरगावे, अमित तोरसे, लक्ष्मण चौगले, प्रा. चंद्रकांत जाधव, निवृती आसबे, किरण चौगले आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
———————-