शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्री मुश्रीफ यांनी केले अभिवादन

Spread the love

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्री मुश्रीफ यांनी केले अभिवादन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवजयंतीनिमित्त कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी कागल नगरपरिषदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभिवादन केले.
      दरम्यान, शिवजयंतीचे औचित्य साधत स्टॅन्ड सर्कल यांच्यावतीने कागल येथील कोवीड सेंटरला सामाजिक बांधीलकीतून ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कागल नगरपरिषदेत गोरगरीब नागरिक व तृतीयपंथींना धान्याचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना योद्ध्यांना अल्पोपहार व सॅनिटायझरचे वाटपही यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, नगरसेवक आनंदा पसारे, सौरभ पाटील, सागर गुरव, महेश गुरव, राहुल माने, अर्जुन नाईक, राहुल गाडेकर, सनी जकाते, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!