मुश्रीफ फाउंडेशनकडून विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान


कोल्हापूर • प्रतिनिधी
     नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या कोविड केअर सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आली. सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र पाटील यांच्याकडे ती देण्यात आली.     
     कोरोना महामारी हे जागतिक संकट महाभयानक आहे. या परिस्थितीत गट-तट, पक्ष – पार्टी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हातात-हात घालून एकसंघपणे काम करूया, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले.
     कागलमध्ये श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात असलेल्या या सेंटरमध्ये जाऊन नवीद मुश्रीफ यांच्यासह केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
      यावेळी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक सतीश घाडगे, नगरसेवक विवेक लोटे, डॉ. महेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कागल शहर अध्यक्ष संजय चितारी, संजय फराकटे, सरचिटणीस बच्चन कांबळे, राहूल गाडेकर, निशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *