हुतात्मा संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नासाठी मुश्रीफ फाऊंडेशनची दोन लाखांची मदत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावून जवान संग्राम पाटील हुतात्मा झाले. पित्याची छत्रछाया हरपलेल्या त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील गेलेलं हास्य पुन्हा फुलू दे, अशी प्रार्थना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केली. शहीद जवान  संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी नवीद मुश्रीफ यांनी नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने या कुटुंबाला दोन लाखांची आर्थिक मदत दिली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
     निगवे खालसा (ता. करवीर) येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घरी भेटून नवीद मुश्रीफ यांनी ही मदत दिली. वडील शिवाजी रामचंद्र पाटील, आई सौ. सावित्री, मुलगा कु. शौर्य, मुलगी कु शिवश्री, भाऊ संदीप व कुटुंबीयांसह ग्रामस्थ उपस्थित होते .
     बारा दिवसांपूर्वी शहीद झालेल्या संग्राम पाटील यांच्या गावी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन त्यांनी शहीद कै. पाटील यांच्या अर्धवट घराचे स्वप्न पूर्ण करू, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने नवीद मुश्रीफ यांनी आर्थिक मदत दिली.
     यावेळी करवीर पंचायत समितीचे उपसभापती सागर पाटील, बिद्री साखरचे संचालक श्रीपती पाटील, जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, उपसरपंच अशोक किल्लेदार, दत्ता पाटील- केनवडेकर, डॉ. टी. वाय. पाटील, एल. एस. किल्लेदार, शहाजी किल्लेदार, संजय गुरव, विलास कांजर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!