डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला मंत्री मुश्रीफ यांच्याकडून अभिवादन

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कागल येथील गैबी चौकातील पुतळ्याला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी हे अभिवादन केले.
      यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, माणसामाणसातील जातिभेदाच्या, वर्णभेदाच्या आणि उच्चनीचतेच्या भिंती पाडून माणूस म्हणून समान पातळीवर जगण्याची ऊर्जा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने दिली. त्यांची शिकवण हेच मानवजातीच्या एकसमान पातळीवर जगण्याचे खरे अधिष्ठान आहे.
       यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, माजी नगराध्यक्ष अशोकराव जकाते, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, नगरसेवक विवेक लोटे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक नितीन दिंडे, नगरपालिका मुख्याधिकारी पंडित पाटील, सुरेश कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!