म्युझिकल युवर्स’ हे संगीतप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ: दिनेश माळी


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापुरात गेली सात वर्षे सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत दिनेश माळी फाउंडेशनच्यावतीने  ‘म्युझिकल युवर्स’ हे संगीतप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे दिनेश माळी फौंडेशनचे दिनेश माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
     ते म्हणाले की, दर्जेदार संगीताच्या प्रसार व प्रचारासाठी दोन वर्षांपूर्वी या ‘म्युझिकल यूजर्स’ संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली. या अंतर्गत कराओके व विविध वाद्यांचे, गायनाचे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संगीत क्षेत्राची आवड असणाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून अनेक दर्जेदार गायक व गायिका तसेच वादक तयार झालेले आहेत व होत आहेत. दोन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या सर्व संगीतप्रेमींना सदाबहार कार्यक्रमातून संधीही देण्यात आली आहे.
     विरासत फाऊंडेशनचे या संपूर्ण उपक्रमास सहकार्य लाभले आहे असे प्रसाद जमदग्नी यांनी सांगितले.
     दिनेश माळी पुढे म्हणाले की, जिंदगी का सफर, लिजेंडरी किशोर विथ सेवन लिजेन्ट्स, रूद – ए – गझल, जिंदगी मिल के बितायेंगे, शाम-ए- गुलजार, किशोर के रंग मुकेश के संग, मेलिडियस ऋषी, इंटर्नल आर. डी, व्हॅलेंटाईन डे रोमँटिक ड्युएटस, किशोर नेव्हर बिफोर, मदहोशी ड्युएट थीम आणि इसेन्शियल किशोर, माहताब -ए-गझल अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमातून या स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे. तिसर्‍या वर्षाच्या पदार्पणाचे औचित्य साधून आता याची व्याप्ती वाढविण्याचा मानस असून नवोदित व स्थानिक संगीतप्रेमींसाठी दर्जेदार सांगितिक प्रशिक्षण व मार्गदर्शन घेण्याची ही नामी संधी आहे.
     त्याचप्रमाणे संगीत सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने मिरजकर तिकटी येथील अंधशाळा, करूणालय संस्था, ‘बळ द्या पंखांना’ अंतर्गत दोन विद्यार्थी दत्तक घेतले असून स्वयम् संस्थेतील चार मुलांच्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलली आहे. तसेच पन्हाळा येथील दिलीपसिंह घाटगे, बालग्रामलाही मोलाची मदत केली आहे. आपल्या सुप्त इच्छा व कलागुणांना वाव देण्यासाठी मातोश्री प्लाझा, दुसरा मजला, व्हिनस कॉर्नर येथे किंवा दिनेश माळी ९८५०५८७६६२, योगिनी खानोलकर ९१५८०५९१६०, मुकुंद वेल्हाळ ९३७०२८३२५५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
      विरासत फाउंडेशनने कोरोनाकाळात ऑनलाइन अभिनय स्पर्धा घेतली. तसेच प्रत्येक रविवारी कोल्हापुरातील वेगवेगळ्या क्षेत्रात  उत्तम काम करत असलेल्या पण त्याची कल्पना कोल्हापुरातील लोकांना नसते
अश्याच लोकांच्या मुलाखतीचा उत्तम कार्यक्रम विरासत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चालू केला. आजपर्यंत १९ लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
तसेच कोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धा सुरू असून ती अंतिम टप्प्यात पोचली आहे, असे विरासत फौंडेशनच्या मीना ताशीलकर यांनी सांगितले.
     पत्रकार परिषदेस दिनेश माळी फौंडेशनच्या अंजली चोडणकर, मुकुंद वेल्हाळ, विरासत फाउंडेशनचे शिल्पा पुसाळकर, गिरीश बारटक्के, रणजित बुगले आदी  उपस्थित होते.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *