कागलमध्ये उद्या ‘माझा व्यवसाय – माझा हक्क’ मेळावा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांअंतर्गत ‘माझा व्यवसाय- माझा हक्क’ या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या उपक्रमाचा प्रारंभ कागलमध्ये येत्या शनिवारी (दि.३०) होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच स्वयंरोजगार मेळावा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
     ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलच्या नगराध्यक्षा सौ.माणिक रमेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू हाॅल, कागल या सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
   कागल, गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत फिरत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून विविध उपयोगी कामांसाठी टाटा एस (छोटा हत्ती) उपलब्ध करून देण्यासाठी नाव नोंदणी होणार आहे.
    कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक: ०२३२५ २४५२४४, ७२४९४९२११५, ९००४१७५६६९ असे असून कागल बसस्थानकाजवळच्या नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अर्जाचा कालावधी ३० जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ असा असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *