नाबार्डचे केडीसीसी बँकेला डिजिटल व्यवहार प्रणालीसाठी सव्वा कोटींचे अर्थसहाय्य

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     नाबार्डकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्व गावे, दुर्गम वाड्या-वस्त्यावरील ग्राहकांना एटीएम सेवा देण्यासाठी तीन मोबाईल व्हॅनकरिता ४५ लाख रुपये तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रुपे डेबिट (किसान क्रेडिट कार्ड) सुविधेपोटी १२ लाख रुपये याप्रमाणे एकूण ५७ लाखाचे  अर्थसहाय्य जमा झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली.
     बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने बँकेच्या यशाचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत. विशेष करून, डिजिटल बँकिंगमध्ये कोअर स्वतःची कोअर बँकिंग प्रणाली करून एटीएम, सीआरएम मशीन्स या सुविधा २६ शाखांमध्ये कार्यरत केल्या. तसेच मोबाईल बँकिंग ॲप, केडीसीसी बँक ऑन व्हील्स ही मोबाइल बँक आपल्या दारी सेवा, मायक्रो एटीएमद्वारे पैसे भरणे व काढणे, गावामध्ये बँकेची मिनी शाखा इत्यादी सुविधा जिल्ह्यातील ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे पी.एम. किसान, कर्जमाफी, व्याज परतावा, शासकीय योजना लाभार्थ्यांच्या रक्कमा, विद्यार्थी शिष्यवृत्ती रक्कमा,  ऊस बिल, दूध बिल, शिक्षक पगार, इत्यादी नियमित येणाऱ्या रक्कमा खातेदाराला सत्वर जमा होतात व त्या ग्राहकांना मोबाईल बँकिंग ॲप, एटीएम द्वारे वापरता येऊ लागल्या आहेत. या सुविधांचा वापरही वाढला आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी, नाबार्डकडून आर्थिक समावेशन निधी (Financial Inclusion Fund) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या-वस्त्यांवर तसेच शाखा नसलेल्या गावांमधून बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी मोबाईल  व्हॅनकरीता बॅंकेस अर्थसहाय्य दिलेले आहे. तसेच ग्राहकांना रुपे डेबिट कार्डद्वारे कोणत्याही एटीएममधून रक्कम काढणेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
      केडीसीसी बँकेने डिजिटल बँकिंग तंत्रज्ञानामध्ये आघाडी घेतली असून ई लॉबीसह, युपीआय प्रणाली, मोबाईल बॅंकिंगसारख्या आधुनिक सुविधा ग्राहकांस दिल्या आहेत. तसेच बँकेने कोल्हापूर जिल्ह्यात “गाव तेथे बँकेची शाखा” या धर्तीवर मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित करणेचे निश्चित केले आहे. याकरिता जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या – वस्त्यांमध्ये ५०० मायक्रो एटीएमद्वारे ग्राहकांना बॅंकिंग सुविधा पुरविली जाणार आहे. याकरिता नाबार्डकडून ३०० मायक्रो एटीएमसाठी ६७  लाखाचे अर्थसहाय्य दिले जाणार असून लवकरच मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहितीही श्री. माने यांनी दिली.

Connect with us: Follow us on below applications and be upadated. cialis generic All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!