कोल्हापूरच्या प्रवेशद्वारास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नांव

Spread the love


• प्रवेशव्दारावर शिवसेनेकडून राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा फलक
कोल्हापूर • प्रतिनिधी
      राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचा अभिमान आहेत. त्यांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही शिवसैनिक काम करत आलो आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला असताना, कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर  शिवसेनेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नांवाचा फलक आज लावण्यात आला.
     गेले दोन दिवसापासून कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर एका उद्योगपतीच्या नावाचा फलक झळकत होता. याबाबत समस्त कोल्हापूरवासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरचा स्वाभिमान आणि अस्मिता दाखवून देण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करीत नावाचा फलक लावण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
      यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नंदकुमार मोरे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, रणजीत जाधव, राजू पाटील, सुनील खोत, पानपट्टी सेनेचे अरुण सावंत, किशोर घाटगे, धनाजी दळवी, अश्विन शेळके, निलेश हंकारे, रियाज बागवान, राजू काझी, सनी अतिग्रे, रमेश पोवार, मंदार तपकिरे, विनय वाणी, सुनील भोसले, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, राज भोरी, सुशील भांदिगरे, अंकुश निपाणीकर, युवा सेनेचे योगेश चौगले, विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, दादू शिंदे, केदार वाघापूरकर, टिंकू देशपांडे, अक्षय कुंभार, सागर कलकुटकी, विश्वजित चव्हाण, दिनेश साळोखे, राहुल माळी, अक्षय खोत, तन्वीर बेपारी आदींसह शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————-                                                                                     Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!