नाबार्डचे नंदू नाईक यांना डेप्युटी जनरल मॅनेजरपदी बढती

Spread the love

• कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारीपदी आशुतोष जाधव
कोल्हापूर • प्रतिनिधी
      नाबार्डचे कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यांना बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची बदली कोल्हापुरातून भोपाळमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर झाली आहे. नाबार्डच्या भोपाळमधील मध्यप्रदेश विभागीय कार्यालयात ते रुजू होणार आहेत. त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारी म्हणून आशुतोष जाधव यांची नियुक्ती झाली आहे. 
      दरम्यान, आशुतोष जाधव यांनी  यापूर्वी छत्तीसगढ़, राजस्थान आणि मुंबई येथील नाबार्ड मुख्यालयात सहाय्यक महाप्रबंधक या पदावर काम केले आहे.
       नंदू नाईक यांनी सहा वर्षांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारकीर्दीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी दुग्धव्यवसाय, कुकुटपालन तसेच इतर योजनांसाठी भरघोस योगदान दिले आहे. जिल्ह्याचा २०१५-१६ सालचा वार्षिक पतपुरवठा ६ हजार ६०० कोटी रुपये होता. त्यामध्ये २०२१-२२ सालाकरिता ११ हजार १०० कोटी इतकी भरघोस वृद्धी झाली आहे. बँकांच्या जिल्हा व तालुकास्तरीय बैठकामध्ये सहभाग घेऊन कृषि क्षेत्रासह प्राथमिक क्षेत्रासाठी पतपुरवठा वाढविण्यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केले आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीमध्येही  त्यांनी मोलचे योगदान दिले आहे.
      दरम्यान, आशुतोष जाधव यांनी  यापूर्वी छत्तीसगढ़, राजस्थान आणि मुंबई येथील नाबार्ड मुख्यालयात सहाय्यक महाप्रबंधक या पदावर काम केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!