नानीबाई चिखलीच्या पूरबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार: मंत्री मुश्रीफ यांची ग्वाही

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     नानीबाई चिखली (ता.कागल) येथील अडीचशेहून अधिक पूरबाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. येथील सर पिराजीराव घाटगे चॅरीटेबल ट्रस्टची जमीन अथवा खडकेवाडा येथील श्री  भैरवनाथ देवालयाजवळची सरकार मालकीची जमीन येथे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली.
       मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नानीबाई चिखली येथे पूर पाहणी दौरा करून पूरबाधिताशी संवाद साधला व धान्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आलेल्या प्रापंचिक साहित्याचे वाटपही केले.   
       यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले,  प्रशासनाने घरांच्या झालेल्या नुकसानीसह शेतीचेही पंचनामे तातडीने करावेत, त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल.
       बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी शुक्रवार पेठ, चावडी गल्ली, नुल्ले गल्ली, खरबुडे गल्ली, लोहार गल्ली, गुरव गल्ली, गैबी गल्ली, पंचशीलनगर या भागातील अडीचशेहून अधिक कुटुंबे पूरबाधित झाल्याचे सांगितले. या समस्येवर कायमस्वरूपी इलाज करण्याची मागणीही त्यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे केली.
     यावेळी सरपंच सौ. छाया चव्हाण, उपसरपंच सौ. मनीषा पाटील, कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, सदाशिव दुकान, धीरज मगदूम, श्रीशैल नुल्ले, मयूर आवळेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!