कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कुल ऑफ लिबरल आर्टस् अधिविभागांतर्गत जर्नालिसम व मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
या वेबिनारमध्ये “इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील संधी व आव्हाने” या विषयावर प्रसिद्ध न्यूज चॅनेल सीएनएन न्यूज १८ च्या पॉलिटिक्स विभागाच्या वरिष्ठ संपादक पल्लवी घोष तर “डिजिटल मीडियामधील संधी व आव्हाने” या विषयावर मुंबई तकचे संपादक कमलेश सुतार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती स्कुल ऑफ लिबरल आर्टचे डीन डॉ.उत्तम जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
या वेबिनारमधून पत्रकारितेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांना पत्रकारितेत उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या संधीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या वृत्तपत्र, टीव्ही चॅनलमध्ये अनेक वर्ष विविध पदांवरती काम केलेल्या सन्माननीय अतिथींचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच सहभाग प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे. तरी या वेबिनारमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी आपला सहभाग नोंदवावा व यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती नावनोंदणी करावी असे आवाहन डॉ.जाधव यांनी केले आहे.
सदर वेबिनार यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रा.परशराम पवार, प्रा.अनुराधा इनामदार, डॉ.सुनंदा शिंदे, प्रा. इंद्रजित कांबळे, प्रा. बसवराज पुजारी आणि प्रा.मृणाल झळके परिश्रम घेत आहेत.
या वेबिनारसाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन के पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————————————-