सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला. कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात जनरल मॅनेजर श्री. घाटगे म्हणाले, मानवी जगण्यामध्ये औद्योगिक सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. औद्योगिक सुरक्षा पाळण्यामध्येच कामगार व कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण कल्याण व हीत आहे. साखर कारखानदारीमध्ये काम करताना कर्मचारी व कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य दिलेच पाहिजे.
       या सुरक्षा सप्ताहामध्ये सुरक्षा निबंध, सुरक्षा घोषवाक्य, सुरक्षा चित्र असे विविध कार्यक्रम घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
       साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नितीन धामणकर यांनी कर्मचाऱ्यांना  सुरक्षितता उपकरणांची हाताळणी याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!