श्री करवीर महात्म्यातील स्त्रोत्रानुसार नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या पूजा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     नवरात्रौत्सवास शनिवार दिनांक १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या  नवरात्रौत्सवात  करवीर निवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मीच्या नऊ दिवस विविध रुपातील पूजा श्री करवीर महात्म्यातील स्त्रोत्रामधून होणारे श्री करवीर निवासिनी दर्शन या आधारे बांधण्यात येणार आहेत .
    नवरात्रौत्सवात बांधण्यात येणाऱ्या विविध रूपातील पुजा पुढीलप्रमाणे आहेत. दि.१७ रोजी घटस्थापना यादिवशी श्री अंबाबाईची कुण्डलिनी स्वरुपात पूजा बांधण्यात येईल. त्यानंतर दि.१८ रोजी द्वितीया तिथीला पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक ,
१९ रोजी तृतीयेला नागकृत महालक्ष्मी स्तवन, दि.२० रोजी चतुर्थीला  सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम ,
२१ रोजी पंचमी असल्याने  गजारुढ अंबारीतील पूजा बांधण्यात येईल. दि.
२२ षष्ठीला श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती तर दि.२३ रोजी सप्तमीला   अगस्त्यकृत सरस्वती स्तवन,दि.२४ रोजी अष्टमी महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात येईल.
२५ रोजी दसरा असल्याने अश्वारुढ पूजा बांधण्यात येईल.
    या सालंकृत पूजा बांधण्यात येतात त्यादिवशी देवीला नेसवण्यात येणाऱ्य साडीचा रंग त्या- त्या दिवशी अनुक्रमे    लाल, पितांबरी, केशरी, निळा / जांभळा, लाल, पांढरा सोनेरी काट, पिवळा / लिंबू , लाल रंग असेल. दि.२५ रोजी दसरा सण असल्याने कोणत्याही रंगाची साडी नेसलेली असेल,अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य, सचिव, श्रीपूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री पूजक मंडळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *