निलराजे बावडेकर यांच्याकडून कोवीड केअर सेंटरसाठी १.२५ लाखांची औषधे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी निलराजे पंडीत – बावडेकर यांनी १.२५ लाखांची औषधे दिली. हे साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात श्रीपंत अमात्य बालविकास ट्रस्ट श्रीमंत माईसाहेब बावडेकर स्कूलचे व्हाईस प्रेसिडेंट निलराजे पंडीत-बावडेकर यांनी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे दिली.
     प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी याबाबत कोल्हापूरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरिकांना महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन निलराजे पंडीत-बावडेकर यांनी (Oxygen Masks – 300, Nasal Cannula- 300, Latex Exam Glovers-20 Box, Vitamin C Tablet-8000, Multi Vitamain Tablet-8000) इत्यादी साहित्य दिले आहे.
     यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक आदी उपस्थित होते.
————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!