कोल्हापूर • प्रतिनिधी
शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळातर्फे आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक विनय पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री नेताजी तरूण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, लालासाहेब गायकवाड, जयवंत साळोखे, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, आनंदा महेकर, नंदू साळोखे, अजिंक्य साळोखे, विशाल सुतार, योगेश सुतार, वैभव सुतार, रवींद्र राऊत, सुमीत कारेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.