नूतन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्विकारला पदभार


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
     नूतन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून आज सकाळी ११ वाजता  जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला.
     श्री. रेखावार यांनी ऑगस्ट २०१२ ते ऑगस्ट २०१३ या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट २०१३ ते फेब्रुवारी २०१४ मध्ये सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली होती. मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या काळात नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी तर फेब्रुवारी २०१५ ते जुलै २०१५ या काळात हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.
जुलै २०१५ ते एप्रिल २०१८ मध्ये परभणी महापालिका आयुक्त, एप्रिल २०१८ ते जुलै २०१९ धुळे येथे जिल्हाधिकारी, जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० महावितरण औरंगाबाद येथे सहायक संचालक, नंतर फेब्रुवारी २०२० ते जानेवारी २०२१ बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. गेल्या काही महिन्यांपासून ते अकोला येथे बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत होते. राहूल रेखावार हे करड्या शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रशासनात परिचित आहेत.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *