निगवे दुमाला गावकऱ्यांकडून स्मशानभूमीस १० हजार शेणीदान


कोल्हापूर • प्रतिनिधी   
      महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने त्यांच्यावर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन करवीर तालुक्यातील निगवे दुमाला गावाने १० हजार शेणी महापालिकेच्या स्मशानभूमीसाठी दिल्या.
     पाच ट्रॅक्टरमधून करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील गावकऱ्यांनी सकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्‍य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्याकडे शेणी दिल्या.
      यावेळी उपसरपंच धनाजी पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, तंटामुक्ती उपाध्यक्ष रणजीत पाटील, माजी जि.प.सदस्य राजाराम कासार, पोलिस पाटील शिवाजी सुतार, सर्जेराव पाटील, संजय पाटील, अर्जुन पाटील, आदित्य कराडे, संजय एकशिंगे, उत्तम चौगले, अजिंक्य माळी, सुशांत जासूद, गोपी एकशिंगे, बंडोपंत जासूद, सनी पाटील, अर्जुन रावळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *