निसर्ग मित्र’चा “प्रश्न तुमचे उत्तर आमचे” ऑनलाईन उपक्रम सोमवारी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     आंतरराष्ट्रीय स्थानिक फळे व भाज्या संवर्धन वर्ष २०२१ अंतर्गत  रोपवाटिका निर्मिती व व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व संरक्षण याविषयी “प्रश्न तुमचे उत्तर आमचे” या ऑनलाईन उपक्रमाचे निसर्ग मित्र, कोल्हापूरच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
     कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाला सर्वजण सामोरे जात आहेत. या संकटाने पर्यावरण संरक्षणाची निकड अधोरेखित केली आहे. पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वृक्ष-वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागेल. आता पावसाळा तोंडावर आला आहे व प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प नक्कीच केला आहे.
     हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी वृक्ष लागवडीची शास्त्रशुद्ध माहिती असणे गरजेचे आहे. नागरीवस्तीत व वनक्षेत्र परिसरात कोणकोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत, त्यापैकी कोणत्या वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे, रोपांची निवड कशी करावी, रोपे कशी तयार करावीत, रोपवाटिकेचे व्यवस्थापन, तयार झालेल्या रोपांची लागवड केव्हा व कशी, तसेच वृक्ष संगोपन आणि संवर्धन कसे करावे या विषयीची शास्त्रीय माहिती सर्व वृक्षप्रेमी व निसर्गप्रेमींना असणे आवश्यक आहे.
      अशाप्रकारची सर्व माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, वृक्षप्रेमींची संख्या वाढावी व त्यायोगे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होऊन पर्यावरणीय समस्या कमी होण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने निसर्ग मित्र कोल्हापूरच्यावतीने “प्रश्न तुमचे उत्तर आमचे’ या ऑनलाइन कार्यक्रमाचे सोमवारी (दि.३१) दुपारी ४ ते ७ या वेळेत आयोजन केले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी निसर्गप्रेमींनी व्हाट्सअप, फेसबुक, मोबाइलफोनच्या माध्यमातून संवाद साधवा व जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
       निसर्गप्रेमींनी आपले प्रश्न दि.२९ मे पर्यंत डॉ. मधुकर बाचूळकर (मो.नं. ९७३०३९९६६८) आणि अनिल चौगुले (मो.नं.९४२३८५८७११ व ९८६०५०७८७३) यांना व्हाट्सअप किंवा फोन करून कळवावे. निसर्गप्रेमींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. मधुकर बाचुळकर ३१ मे रोजी ४:३० ते ६:३० या वेळेत ऑनलाइन google meet संवादातून देतील. सर्वांना लिंक दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!