कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत नागरीकांना प्रवेश बंद
कोल्हापूर • प्रतिनिधी
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरामध्येही गेले काही दिवस कोविड-१९ या संसर्गजन्य साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षा विचारात घेवून ६ एप्रिलपासून महापालिकेत कार्यालयीन कर्मचारी वगळून सर्व नागरिकांचा कार्यालयीन प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.
याबाबत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दि. ५एप्रिल रोजीच्या बैठकीमध्ये महानगरपालिकेत प्रवेश बंदी करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. यावेळी महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरीकांची महापालिकेच्या संबंधित कामाबाबत गैरसोय होऊ नये यासाठी नागरीकांना महानगरपालिकेची ऑनलाईन सेवा सुरु करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
कोविड-१९ या संसर्गजन्य साथीच्या आजारास प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये रुग्णांचे सर्वेक्षण, शोध, चाचणी, प्रतिबंधात्मक उपचार व मदतकार्य यांचेशी संबंधित कर्तव्य बजावण्यासाठी विविध विभागातील विविध संवंर्गातील अधिकारी/कर्मचारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत.
शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तसेच नागरीक महापालिकेमध्ये विविध कामासाठी येत आहेत. या कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरीकांचे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नाही. महानगरपालिकेचे दैनंदिन कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनाही या कोरोना संसर्गाची लागण होवू नये यासाठी नागरिकांना महापालिकेत प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी आपल्या तक्रारी देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर नागरीक तक्रार निवारण या लिंकवर क्लिक करुन आपली नोंदणी करुन आपल्या तक्रार/सुचनांबाबत ऑनलाईन संबंधित विभागास सादर करु शकतात किंवा टोल फ्रि क्रमांक – १८०० २३३ १९१३ या नंबरवर कॉल करुन आपल्या तक्रारी कार्यालयीन वेळेत नोंदवू शकतात.
वरील दोन्ही सुविधांचा वापर करणे शक्य नसलेस अत्यावश्यक सेवेसाठी महानगरपालिका येथील ब्युरो विभागामध्ये जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दि.५ एप्रिल रोजीच्या आदेशाचे नियमांचे पालन करुन लेखी स्वरुपात तक्रार अर्ज दाखल करुन घेणेची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
वरीलप्रमाणे शहरातील नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन कोविड-१९च्या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
———————————————–
![]() | ReplyForward |