कोल्हापूर • प्रतिनिधी संजय घोडावत विद्यापीठामध्ये एनएसएस विभागामार्फत ‘शिवस्वराज्य दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या स्कुल ऑफ लिबरल आर्ट्सचे डीन डॉ.उत्तम जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा.बसवराज पुजारी, प्रा.अर्जुन पाटील, प्रा.सुशांत पाटील, प्रा.संदीप वाटेगावकर, माणिक सावंत, दयानंद सातवेकर, वारिज सोंडूर व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ.उत्तम जाधव म्हणाले की, ” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा त्यांच्या कर्तृत्वाचा व रयतेचा सन्मान सोहळा होता. ६ जून १६७४ रोजी राजे छत्रपती झाले. स्वराज्याची सुरुवात या सोहळ्यानेच झाली होती, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे. शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक होते. त्यांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे त्यांचे गनिमी काव्याचे तंत्र जगभरातील योध्यांनी युद्धात वापरले. परस्त्री मातेसमान मानून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून तिला न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. शिवजयंती, शिवराज्याभिषेक हे उत्सव साजरे करण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे की, येणाऱ्या पिढीला महाराजांच्या पवित्र विचारांचा व इतिहासाचा परिसस्पर्श होऊन त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची जोपासना होईल.” कार्यक्रमाचे आभार प्रा.बसवराज पुजारी यांनी मानले. या आयोजनाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ.एम.टी तेलसंग, प्रभारी कुलसचिव डॉ.एन.के.पाटील व संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ———————————————– Attachments areaReplyForward