‘एक नंबर… सुपर’ची ११ मार्चला चित्रपटगृहांमध्ये धमाल!

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मनोरंजनाचा सुपर फॉर्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कवडे ‘टकाटक’च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा एक नवी कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही कहाणी साधीसुधी नसून, ‘एक नंबर… सुपर’ आहे. कारण मिलिंद कवडेंच्या आगामी चित्रपटाचं शीर्षकच ‘एक नंबर… सुपर’ असं काहीसं सुपरहिट वाटावे असे आहे. ‘बाबूराव…’ आणि ‘तुकडे तुकडे…’ या गाण्यांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. टिझर, ट्रेलर आणि गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
      निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच या चित्रपटची कथा-पटकथा लिहिणारे मिलिंद म्हणाले की, ‘एक नंबर… सुपर’च्या माध्यमातून आम्ही एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट बनवला आहे. चहूबाजूंनी प्रेक्षकांना मनोरंजनाची जणू मेजवानी असलेला हा चित्रपट प्रेक्षकही सर्वार्थानं ‘एक नंबर… सुपर’ ठरवतील अशी आशा आहे. माझ्या आजवरच्या चित्रपटांप्रमाणेच विनोदाच्या सहाय्यानं एक महत्त्वपूर्ण विचार समाज आणि जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट करेल अशी आशाही मिलिंद यांनी व्यक्त केली.
       महेश शिवाजी धुमाळ आणि जितेंद्र शिवाजी धुमाळ यांच्या साथीने मिलिंद यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने ‘एक नंबर… सुपर’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मिलिंदने पुन्हा एकदा काही जुन्या सवंगड्यांना सोबत घेऊन, तर काही नवोदितांना साथीला घेऊन नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
      प्रथमेश परब ‘टकाटक’च्या यशानंतर पुन्हा मिलिंद यांच्या ‘एक नंबर… सुपर’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
      संजय नवगिरे यांनी या चित्रपटाचं संवादलेखन केलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे, तर संकलनाची बाजू प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे. पटकथा सहाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिलं असून, डिओपी हजरत शेख (वली) यांच्या अनोख्या सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!