२६ रोजी भारत बंद : ‘ कॅट’ची घोषणा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      जीएसटी विरोधात दि.२६ फेब्रुवारी  रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) कडून ‘भारत बंद’ ची घोषणा करण्यात आली आहे.
      कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार संम्मेलन नागपुरात झाले. या संम्मेलनास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन सचिव ललित गांधी, प्रशांत शिंदे व विजय नारायणपूरे हजर होते. यामध्ये देशातील सर्व राज्यांतील २०० हून अधिक नामवंत व्यापाऱ्यांनी संयुक्तपणे हजेरी लावली होती. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस  प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ व ‘देशव्यापी चक्काजामची’ संयुक्तपणे घोषणा केली आहे.
     श्री. भारतीया व श्री. खंडेलवाल यांनी जीएसटी कौन्सिलच्या फायद्यासाठी जीएसटीचे स्वरूप विकृत केल्याचा आरोप केला आणि असे म्हटले की, ‘जीएसटी ही पूर्णपणे कर प्रणाली आहे. जीएसटीचे मूळ स्वरूप गोंधळलेले आहे. सर्व राज्य सरकार त्यांच्या स्वार्थासाठी जीएसटीच्याबाबत अधिक चिंतित आहेत. परंतु त्यांना कर प्रणालीच्या सहजीकरणाची चिंता नाही. व्यवसाय करण्याऐवजी देशातील व्यापारी दिवसभर जीएसटी कर पालनामध्ये घालवत आहेत, जी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतीतील उलट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जीएसटीच्या सद्यस्थितीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षात ९३७ हून अधिक दुरुस्तीनंतर जीएसटीची मूलभूत रचना बदलली आहे.’
    वारंवार आवाहन करूनही जीएसटी कौन्सिलने अद्याप कॅटने उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली नाही, म्हणून देशभरातील व्यापाऱ्यांपर्यंत आपले मत पोहचवण्यासाठी, तसेच जीएसटीच्या विकृत प्रकाराविरूद्ध कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘भारत बंद’ करण्याची घोषणा केली आहे. या बंदला पाठिंबा दर्शवित, ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने देशव्यापी चक्काजामची घोषणा केली आहे.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी व व्यापारी संघटना यांना २६ फेब्रुवारीच्या ‘भारत बंद’ मध्ये सहभागी होण्याचे व यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. 
———————————————– Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!