भाजपाच्यावतीने ओ.बी.सी. राजकीय आरक्षणासाठी “चक्काजाम” आंदोलन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून त्यांनी सुप्रीम कोर्टात ओ.बी.सी. समाजाचा सॅपल सर्वे करून इम्पिरियल डेटा सादर केला नाही. तसेच सत्तेत आल्यापासून ओ.बी.सी. चा मागास आयोग स्थापन केला नाही. या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने ओ.बी.सी. चे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवले, यामुळे ओ.बी.सी समाजाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले. या निर्णयाच्या विरोधात भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात दाभोळकर कॉर्नर येथे भाजपाच्यावतीने “चक्काजाम” आंदोलन करण्यात आले.
      राजषी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून या आंदोलनाची सुरुवात झाली.
     भाजपा ओ.बी.सी. मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाभोळकर कॉर्नर परिसर येथे एकत्र येऊन चौकातील सर्व रस्ते रोखून धरले. ओ.बी.सी. आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काच – नाही कोणाच्या बापाचे,  तीन बिघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 
       यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातले महाविकास आघाडी सरकार काही संबंध नसताना दरवेळी आरक्षणाचा मुद्दा निघाला की केंद्र सरकारकडे बोट दाखवते पण हा केंद्राचा विषयच नाही हे महाविकास आघाडीतील नेत्यांना अजून समजलेच नाही. जर या ओ.बी.सी. समाजाच्या राजकीय आरक्षणचा निर्णय केंद्र सरकारचा असला असता तर बाकीच्या राज्यातील ओ.बी.सी. समाजाचे राजकीय आरक्षण संपले असते, तसे न होता फक्त महाराष्ट्रातील ओ.बी.सी. समाजाचे राजकीय आरक्षण संपले आहे. महाविकास आघाडी सरकारची ओ.बी.सी. आरक्षणा बाबतीतली तळमळ पाहता असे लक्षात येते की, त्यांना ह्या ओ.बी.सी आरक्षणाचे काही देणे-घेणे नाही. सॅपल सर्वे करून इम्पिरियल डेटा न करता महाविकास आघाडी सरकारने ओ.बी.सी समाजाला अंधारात ठेवले आहे.
      भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी छगन भुजबळ व नाना पटोले यांना जाहीर आवाहन केले की, कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात ओ.बी.सी. समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका व्यासपीठावर चर्चा करावी. देवेंद्र फडणवीस नक्की सिद्ध करतील की राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओ.बी.सी. चे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.
      ओ.बी.सी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार म्हणाले, ओ.बी.सी. राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यामध्ये जो काही रद्द बाबत निकाल झाला तो निकाल अतिशय धक्कादायक आहे. ह्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील ५६,००० ओ.बी.सी. राजकीय जागेबद्दल देखील लागू होत असून त्यामुळे ओ.बी.सी. समाजाचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे.
      भाजपा प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक व भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी संदीप कुंभार, हंबीरराव पाटील, महेश मोरे, विट्ठ्ल पाटील, ओ.बी.सी मोर्चा महिला अध्यक्षा विद्या बनछोडे, वर्षा कुंभार, सरचिटणीस विद्या बागडी, चिनार गाताडे, संध्या तेली, अर्चना वडणगेकर, स्वाती तेली, ओ.बी.सी मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेश यादव, सरचिटणीस राजाराम परीठ, अभिजित पोवार, साजन माजगावकर, संजय खेडकर, दीपक पेटकर, प्रकाश कालेकर, 
अमोल महाडिक, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, संजय सावंत, दीपक काटकर, संतोष भिवटे, अमोल पालोजी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजय खाडे, अजित ठाणेकर, भगवान काटे, नाना कदम, विजय सूर्यवंशी, सुनील कदम, भैय्या शेटके, गायत्री राउत, विवेक कुलकर्णी, भरत काळे, दिलीप बोंद्रे, अभिजीत शिंदे, रहीम सनदी, ओंकार घाटगे, दिपक काटकर, आजम जमादार, दिनेश पसारे, बापू राणे, संदीप कुंडले, प्रशांत पलीचा, तानाजी निकम, लखन यादव,
प्रीतम यादव, अमर जत्राटे, पृथ्वीराज जाधव
यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————— Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!