जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
       जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे १०ते २० मे दरम्यान दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.       
      शिबीरामध्ये कुस्ती, योगासन, बुध्दीबळ, टेबल टेनिस, जलतरण, फुटबॉल, हॉकी व नेमबाजी या खेळाचे प्रशिक्षण शिबीर छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथे सकाळी ६:३० ते ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत होणार आहे. खेळाडूंना अनुभवी व राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षक यांच्याकडून केले जाणार आहे. शिबीराकरिता वरील प्रत्येक खेळातील ८ ते १४ वयोगटातील प्रथम नावनोंदणी करणाऱ्या २५ मुले व २५ मुली अशा एकूण ५० प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येईल. सहभागी प्रशिणार्थीं खेळाडूंना क्रीडा गणवेश, (टी शर्ट, शॉर्टस) अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येईल.
       अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक उदय पवार (मो.नं.९८९०७७०६४९), प्रवीण कोढंवळे (मो.नं.९८२३७९२८७९) व रविभूषण कुमठेकर (मो.नं.९४०३५७०३५८) यांच्याशी संपर्क साधावा, असे चंद्रशेखर साखरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!